ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.
TSK
TSK · प्रेषि 19:22
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्याठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्यास घेऊन त्यांची सुंता केली; कारण त्याचा पिता ग्रीक आहे हे सर्वांना ठाऊक होते.
¶ जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.
शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.
माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात.
माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.
आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.
एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता.