TSK

TSK · प्रेषि 4:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्यादिवशी सर्व लोकांस सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले.

आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?”

तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले,

तर तुम्हा सर्वास व सर्व इस्राएल लोकांस हे माहित असावे, की ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मरण पावलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.

¶ तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले, त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले.