TSK

TSK · प्रेषि 7:10

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला.

¶ मग यहूदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, “माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजासमान आहात.

तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”

नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.

मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.

कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.

मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो.

प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.

मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.