¶ त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.”
TSK
TSK · आमो 1:11
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला.
अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरी लोकांचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात.
पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस.
ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका.
दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
¶ जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.
ऊस देशात राहणाऱ्या अदोमाच्या कन्ये आनंदित हो आणि हर्ष कर. पण लक्षात ठेव की प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल, तेव्हा तू मस्त होऊन आपणास विवस्त्र करशील.
¶ मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले.
तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
अदोम असे म्हणाला, “आमचा नाश झाला आहे, तरी पण आम्ही परत जाऊन जे उध्वस्त झाले आहे ते बांधू.” पण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “ते बांधतील पण मी पाडून टाकीन.” आणि लोक त्यांना दुष्टांचा देश म्हणतील, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर कायमचा रागावला आहे.
¶ तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,