TSK

TSK · आमो 1:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”

यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले.

¶ मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.”

राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.

मनहेमने तिफसाह तसेच त्यातले सर्वजण, तसेच तिरसापासून त्याच्या सीमेमधले सर्वजण जीवे मारले, कारण लोकांनी त्यास नगराची वेस उघडून दिली नाही, म्हणून त्यांने त्यांना मारले. त्याने त्या नगरातल्या सर्व गर्भवती स्त्रियांनाही कापून टाकले.

¶ यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले.

¶ पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”

गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.

अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय? तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”

¶ नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले की,

तू म्हणालास, ती दोन राष्ट्रे आणि ही दोन देश माझे होतील आणि आम्ही त्यांचा ताबा घेऊ. तेव्हा तेथे परमेश्वर त्यांच्याबरोबर उपस्थित होता.

हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.

कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो.