TSK

TSK · आमो 5:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.

तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.

कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल घराणे होय. आणि यहूदाचे पुरुष हे त्यातील आनंददायी लागवड होय. त्याने न्यायाची वाट पाहिली, परंतु त्याऐवजी, तेथे मारणे; न्यायीपणाची वाट पाहिली, परंतू त्याऐवजी, मदतीचा आक्रोश आढळून आला.

“ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.”

पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही, नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल.

हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पुष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.

मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.

¶ मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो, आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका,

त्यांची संपत्ती लूट अशी होईल, आणि त्यांच्या घरांचा त्याग करण्यात येईल. ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील, पण त्यांना द्राक्षरस प्यायला मिळणार नाही.

पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही?