TSK

TSK · आमो 6:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते.

चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.

ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.

मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत.

परमेश्वर, असे म्हणातो, त्या दिवसात मंदिरातील गाणे विलाप होतील. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील, प्रत्येक स्थानांत लोक गुपचूप ती बाहेर टाकून देतील.”

तुझ्यात वीणा वाजविणाऱ्यांचा आवाज, संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजविणाऱ्यांचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढे कधी आढळणार नाही; आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही.