TSK

TSK · आमो 9:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मीखाया म्हणाला, “तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती.”

¶ उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते.

¶ जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले.

तुम्ही म्हणता, नाही! कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.

पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.

परमेश्वर देवाचे गौरव करुबावर उठून घराच्या उंबरठ्यावर आले, आणि वेशी परमेश्वर देवाच्या प्रकाशाने चमकू लागल्या. त्याने घर भरुन गेले आणि वेशी देवाच्या गौरवाने प्रकाशू लागल्या.

धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही. आणि जोरात धावणारे सुटणार नाही; घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.

इसहाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल, इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील, आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”

तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे त्याच्या दारापाशी ओरडतील, त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. करण त्याने गंधसरूचे लाकडी खांब उघडे केले आहे.

देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.

वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.