TSK

TSK · आमो 9:5

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.

हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.

¶ अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील,

म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.

पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.

त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो.

पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले! जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; खोल समुद्राने आवाज उंचावला आहे, समुद्राने आपला हात उंचावला आहे.

¶ तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.