TSK

TSK · अनु 13:15

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परंतु या सर्व लोकांच्या देवाला तू नमन करू नकोस; त्यांची सेवा करू नकोस, त्यांना जमीनदोस्त करावेस; आणि त्यांच्या स्तंभाचे तुकडे तुकडे करावेस.

त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.

तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.

हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.

आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात नगरात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, “आम्हांला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?”

¶ बंदीवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले

आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?”