¶ मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण, व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
TSK
TSK · अनु 21:5
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांस आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.
अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे.
खुनाचा वाद, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्वबाबतीत प्रत्येक वेळी लोकांस सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.