TSK

TSK · अनु 4:33

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.

¶ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून बोललो हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे.

परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.”

पुढे मोशे म्हणाला, ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हास मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वतापाशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिल्या.

साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही.

तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!”