तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.”
TSK
TSK · अनु 6:2
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील.
आपल्या आईवडीलांचा मान ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हास दीर्घायुष्य मिळेल. तुम्हास दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.
त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
¶ आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी.
तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा.
हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल.
तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्यास सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हास त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन रहावे म्हणून एवढे कर.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.
त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजानी त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक दिवशी माझा आदर करावा म्हणून मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.
आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.