¶ अशाप्रकारे स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोरुन बाहेर घालवून देणार आहे, तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले.
TSK
TSK · अनु 9:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.
तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वरास ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते आपल्या देवाकरता आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून घालवून देईल.
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्याकरिता हे करत नाही, हे तुम्हास माहित असू द्या. म्हणून इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही आपल्या मार्गाविषयी लज्जित व फजीत व्हा.
बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग;
¶ कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.