TSK

TSK · निर्ग 10:21

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरुवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.”

दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.

त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात.

त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले. त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.

पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत, ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.

जसे ते जन्मलेले बाळ निरर्थक आहे आणि अंधकारात नाहीसे होते व त्याचे नाव लपलेलेच राहते.

ते पृथ्वीकडे दृष्टी टाकतील आणि पाहा विपत्ती अंधकार व दु:खाचे निराशेचे काहूर त्यांना दिसेल. ते अंधकाराच्या भूमीत लोटले जातील.

¶ मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.

¶ त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.

ते पाणी नसलेले झरे आहेत, ते वार्‍याने विखरलेले ढग आहेत आणि अंधाराचा गडद काळोख त्यांच्यासाठी राखलेला आहे.

ते समुद्रावरच्या विक्राळ लाटांसारखे स्वतःची लाज फेसाप्रमाणे वर आणतात. ज्यांच्याकरता, सर्वकाळसाठी निबीड अंधार राखून ठेवलेला आहे असे भटके तारे ते आहेत.