TSK

TSK · निर्ग 12:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुम्ही त्याचे मांस कच्चेच किंवा पाण्यात शिजवून खाऊ नये तर विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडी हीसुद्धा खावीत.

या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये.

माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.

त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे दु:ख स्मरणाची भाकर होय. त्याने तुम्हास मिसरमधील कष्टांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हास तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका.

लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांस ती नेऊन दिली.

तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे; जर तुम्ही लोक त्याचे जीवन पापार्पण करता, तो त्याची संतती पाहील, तो आपले दिवस दीर्घ करील आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल.

“मी दावीदाच्या घराण्यात आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.

¶ ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, ‹“घ्या, खा. हे माझे शरीर आहे.”›

तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना?

तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;