त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
TSK
TSK · निर्ग 20:6
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो.
मी माझा देव, “परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबूली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो.
‹ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”›
¶ ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत.
देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.