TSK

TSK · निर्ग 20:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विश्रामवार, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे. तुम्हास भाजावयाचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवावे.”

¶ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,

¶ मोशेने सगळ्या इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या या;

तुम्ही माझे शब्बाथ, काम न करता विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्रस्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!

तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.

¶ तुझ्या पवित्र शब्बाथाचा त्यांना परिचय करून दिलास आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम आणि धर्मशास्त्र दिलेस.

माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वत:चा आनंद पूर्ण करू नये म्हणून शब्बाथापासून आपला पाय फिरवशील आणि शब्बाथाला आनंद, परमेश्वराचा पवित्र दिवस, आदराचा दिवस म्हणशील, आणि आपले स्वत:चे कामकाज न करता व आपल्याच मनाचा आनंद न पाहता आणि आपल्याच गोष्टी न बोलता, तू त्याचा आदर करशील.

आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.