¶ खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
TSK
TSK · निर्ग 23:7
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
¶ तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये.
लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”
ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.
जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात, जे कडुपणाला गोड असे व गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!
परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
¶ वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
¶ ‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.