आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर.
TSK
TSK · निर्ग 28:40
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
आणि अहरोनाला व त्याच्या पुत्रांना कमरबंद बांध व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांचे याजकपद कायमचे राहील, ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले ह्यांच्यावर संस्कार करावेत
पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
त्यांनी चोर्या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.
तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.