निर्ग 20:23
TSK
माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”
TSK
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.”
मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे.
हे परमेश्वरा आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे.