TSK

TSK · निर्ग 38:9

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.

पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.

पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे; आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.

त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.