राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही.
TSK
TSK · उत्प 2:24
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा.
परंतु आजपर्यंत जसे तुम्ही करीत आला, तसे आपला देव परमेश्वर याला बिलगून राहा.
मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
¶ काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय?
बर्णबा चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता, जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे, त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला, अंत्युखियातील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, कधीही तुमचा विश्वास गमावू नका, नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.
तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील.
आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की पत्नीने पतीला सोडू नये.
यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.