मिसराचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ही त्याची पत्नी आहे, आणि मग तुझ्यासाठी ते मला मारून टाकतील, परंतु तुला जिवंत ठेवतील.
TSK
TSK · उत्प 20:11
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या पत्नीविषयी त्यास विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी पत्नी आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.”
पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”
दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.