TSK

TSK · उत्प 24:26

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

नंतर मी मस्तक लववून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर याची स्तुती केली, कारण त्याने मला माझ्या धन्याच्या भावाच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला.

तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.

मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले.

¶ तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.

हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदीत झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली.

पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील.

अरण्यात राहणारे त्याच्यासमोर नमन करोत; त्याचे शत्रू धूळ चाटोत.

मी परमेश्वरास काय देऊ? आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का?