TSK

TSK · उत्प 29:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

मग इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “माझ्या मुला जरा माझ्याजवळ ये व मला चुंबन दे.”

एसावाने जेव्हा याकोबाला पाहिले तेव्हा त्यास भेटण्यास तो धावत गेला आणि त्यास आलिंगन दिले. त्याने गळ्यात गळा घालून याकोबाला मिठी मारली. त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.

तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले.

मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.

पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.