परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.
TSK
TSK · उत्प 41:51
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
¶ योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
वास्तविक पाहता योसेफ वंशाचे दोन वंश मनश्शे व एफ्राइम असे होते, आणि लेव्यांना देशात त्यांनी वाटा दिला नाही, केवळ वस्तीसाठी नगरे, आणि त्यांच्या पशूंसाठी व त्यांच्या मालमत्तेसाठी त्यांना फक्त काही नगरात त्यांची जागा दिली.
तू तुझे दु:ख विसरशील, तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.
जो कोणी पृथ्वीवर आपणाला आशीर्वाद देईल, तो सत्याच्या देवाच्या ठायी स्वत:ला आशीर्वाद देईल. जो कोणी पृथ्वीवर शपथ वाहतो, तो सत्याच्या देवाची शपथ वाहील. कारण पूर्वीचे सर्व त्रास विसरले जातील, कारण ते माझ्या दृष्टीपासून लपून आहेत.