TSK

TSK · उत्प 47:12

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

देवाने मला तुमच्या आधी येथे पाठवले आहे, यासाठी की, तुमचा पृथ्वीवर बचाव होऊन तुम्ही शेष रहावे आणि तुम्हास जिवंत ठेवून तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी.

येणाऱ्या दुष्काळाच्या पाच वर्षात मी तुम्हास सर्व प्रकारचा पुरवठा करीन त्यामुळे तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सर्व काही गमावून गरीब होण्याची वेळ येणार नाही.

मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस त्याने फारोचे गुलाम केले.

तेव्हा आता तुम्ही भिऊ नका. मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन.” अशा रीतीने त्याने त्यांचे समाधान केले आणि त्यांच्याशी ममतेने बोलला.

तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”

‹कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’›

तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.

पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.