आमच्या सरदारांनी विहीर खणली, सरदारांनी ही विहीर खणली. त्यांच्या राजदंडानी व आपल्या काठ्यांनी विहीर खणली, मग त्यांनी अरण्यापासून ते मत्तानापर्यंत प्रवास केला.
TSK
TSK · उत्प 49:10
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.
तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
यहूदाच्या घराण्यातील सहा हजार आठशे, सैनिक ढाल आणि भाले यांसह लढाईस सशस्त्र होते.
मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे.
मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.
¶ इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल.
तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्राएलातून बहिष्कृत केलेल्या आणि यहूदातील विखुरलेल्यांस पृथ्वीच्या चारही दिशांकडून एकत्र करील.
¶ पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.
पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही; आणि किनारपट्टीवरील देश त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील.
परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांस दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन, तेव्हा ते तुझी मुले त्यांच्या हातात आणि तुझ्या मुलींना खांद्यांवरून तुझ्याकडे आणतील.
पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे.
राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, आणि राजे तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
परमेश्वर असे म्हणतो, पाहा! असे दिवस येत आहेत. “मी दावीदाकरीता नितीमान अंकुर उगवीन.” तो राजा म्हणून राज्य करेल, तो देशात न्याय व न्यायीपण करील, आणि भरभराट घेऊन येईल.
तर याकोबाची संतती व माझा सेवक दावीद याच्या संततीचा मी त्याग करीन आणि दावीदाच्या संततीपैकी कोणी अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या संततीवर सत्ता चालविण्यास ठेवणार नाही; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन व त्याजवर दया करीन.”
तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.
तू अग्नीसाठी इंधन होशील; तुझे रक्त भूमिच्या मध्यभागी सांडले जाईल. तुझे स्मरण पुन्हा केले जाणार नाही. “मी परमेश्वर देव हे जाहीर करत आहे.”
एफ्राईम मला लबाडीने आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले, पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.
आणि मी प्रत्येक राष्ट्रांना हालवून सोडीन, आणि प्रत्येक राष्ट्र त्यांच्या मोलवान वस्तू माझ्याकडे घेऊन येतील, आणि मी हे मंदिर वैभवाने भरून टाकीन! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरूशलेमेला येतील.
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”
तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल.
आणि त्यास म्हटले, ‹“जा, शिलोहाच्या तळ्यात धू.”› (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.
पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”
यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.”
कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
¶ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.