TSK

TSK · उत्प 6:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.

परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.

त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही.

पण, परमेश्वरा, तू मला जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाला पारखतोस. कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांना तयार कर.

मी मनुष्य व प्राणी यांचा नाश करीन; मी आकाशांतले पक्षी व समुद्रातील मासे आणि दुष्ट व त्याचे अडखळणे नष्ट करीन. मनुष्य पृथ्वीवरून मी नाहीसा करून टाकीन, असे परमेश्वर म्हणतो.