TSK

TSK · इब्री 6:17

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.

परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.

परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”

¶ (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझे बहिणी, माझे वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत. मी माझा मध मधाच्या पोळ्यासहीत खाल्ला आहे. मी माझा द्राक्षरस व दूध प्यालो आहे. मित्रांनो, खा. माझ्या प्रियांनो; प्या, मनसोक्त प्या.

संपूर्ण पृथ्वीसाठी योजिलेला उद्देश हाच आहे आणि जो हात सर्व राष्ट्रांवर उगारलेला आहे तो हात हाच आहे.

“कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः जशी मी शपथ घेऊन म्हणालो नोहाचा जलप्रलय पुन्हा कधीही भूमीवर चालणार नाही, तशी मी शपथ घेतली मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुला धिक्कारणार नाही.

तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही, परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.

परमेश्वर असे म्हणतो, “जर माझा दिवस व रात्र याविषयीचा माझा करार अढळ नाही किंवा मी जर आकाशाचे आणि पृथ्वीचे नियम स्थापिले नाहीत,

‹चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.›

कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.

आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.

देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे.

¶ विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्‍यात वस्ती होती.

¶ माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?

¶ पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.