TSK

TSK · होशे 6:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते.

पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे.

त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस.

कारण यहूदा व इस्राएल घराण्याने माझा फार विश्वासघात केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.

मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो.

ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.

ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्यादिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,’ असे प्रभू म्हणतो.