TSK

TSK · यश 1:17

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.

योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत.

तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.

परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.

त्यांनी आपल्या आईबापांचा अनादर केला आहे. व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणुक दिली आहे.

म्हणून हे राजा माझी मसलत तुला मान्य असो, पाप सोडून योग्य ते कर, आपली दुष्टता सोडून जाचलेल्यावर दया कर. असे केल्यास तुझी समृध्दी जास्त दिवस राहील.”

पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित रहाल.

¶ पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.