TSK

TSK · यश 12:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”

त्यांना भूक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत. कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.

कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.

त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.

¶ मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, ‹“कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.›

¶ नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.