TSK

TSK · यश 2:7

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.

राजा शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनाचे वनामधील” सर्व शस्त्रास्त्रे आणि सामग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.

¶ किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते.

तुम्ही म्हणता, नाही! कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.

पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.

परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन.

कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.