¶ नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, तू तुझ्या पत्नीची वाणी ऐकली आहे आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी आज्ञा दिलेली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्ले आहेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू तिजपासून अन्न मिळवण्यासाठी आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्ट करशील;
TSK
TSK · यश 24:5
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरून कायम राहील.
¶ म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
¶ ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.
तो म्हणाला, मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होईल ते मी पाहीन, कारण ही माणसे फार कुटील आहेत. ही मुले अविश्वसनीय मुलांप्रमाणे आहेत.
त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमात त्याठिकाणी नियम व कायदे स्थापले.
परमेश्वर देवाच्या इच्छेविरुध्द इस्राएल लोकांनी पापे केली होती, म्हणून असे घडले. कारण इस्राएलाच्या लोकांनी परमेश्वर त्यांचा देव ज्याने त्यांना मिसरचा राजा फारो याच्या जाचातून सोडवले होते, त्याच्याविरुध्द पाप केले आणि दुसऱ्या देवांचे भजन पूजन केले.
मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले, त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.
पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्यास राग होता.
मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला.
हे आकाशा, ऐक आणि हे पृथ्वी लक्षपूर्वक कान दे; कारण परमेश्वर हे बोलला आहेः “मी लेकरांचे पालनपोषण करून त्यांना वाढविले, परंतु त्यांनी मजविरूद्ध बंडखोरी केली.
परमेश्वर असे म्हणत आहे, ज्यावरून मी तुझ्या आईबरोबर घटस्फोट घेतला त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र कोठे आहे? आणि ज्याच्याकडे मी तुम्हास विकले तो सावकार कोठे आहे? पाहा, तुम्हास विकले कारण तुमच्या पापामुळे आणि तुमच्या बंडखोरीमुळे, तुमच्या आईला दूर पाठविण्यात आले. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हास देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले,
कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरूद्ध साक्ष देतात. कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत, आणि आम्हांस आमची पातके माहीत आहेत.
ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांकडे वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”
ते त्यांच्या दागिण्यांवर घमंड करीत होते, त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरस्कार आणणाऱ्या घृणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या. तिरस्करणीय कार्य त्यांच्याशी केले आहे. म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अपवित्र केल्या आहे.
रानामध्ये इस्राएल घराण्याने माझा तीव्र विरोध केला. ते माझ्या नियमांनी चालले नाहीत, ज्यांच्यामुळे त्यांचा बचाव होईल, त्याऐवजी त्यांनी माझ्या नियमांचा नकार केला, त्यांनी माझ्या पवित्र शब्बाथाचा अनादर केला; म्हणून मी म्हणालो त्यांचा रानामध्येच नाश करण्यासाठी मी आपला क्रोध त्यांच्यावर ओतीन असे मी म्हटले.
‘मानवाच्या मूला’ तिला सांग तू अशी भूमी आहेस जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही.
¶ तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल, आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील. या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.
आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्ट्यांकडून दिली होती.
ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते, ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही.
ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत.
¶ आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते