म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही.
TSK
TSK · यश 28:17
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याचा ओळंबा मी यरूशलेमेवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करून ठेवावी तशी मी यरूशलेमची गत करीन.
कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
¶ कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे
पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे. नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने ताडना करेल.
त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.
माझे लोक शांतस्थळी वस्ती करतील, सुरक्षित निवासस्थानी, आणि शांत जागी राहतील.
म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.
पाहा! परमेश्वराकडून वादळ येत आहे. त्याचा राग बाहेर जात आहे, आणि ती क्रोधाच्या वादळाची भोवळ आहे. ती दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.
यास्तव माझ्या लोकांस भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे. आणि त्यांना पांढरा रंग दिला आहेत.
आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. पाहा, परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता.
पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.
कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’
¶ पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
आणि एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.