TSK

TSK · यश 28:20

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?

ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो.

जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे. जो अन्नार्पण अर्पितो तो डुकराचे रक्त अर्पणारा असा आहे, जो धूप जाळतो तो मूर्तीची स्तुती करणारा असा आहे, त्यांनी स्वत: आपले मार्ग निवडले आहेत आणि त्यांचा जीव त्याच्या अमंगळ पदार्थाच्या ठायी संतोष पावतो.

¶ मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.