TSK

TSK · यश 30:29

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.

देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.

तो माझा दुर्ग आहे आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण तो, त्याचे सर्व मार्ग, उचित आहेत! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ आहे.

¶ मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.

कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे?

हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे.

देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.

शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.

¶ त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.

सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.

¶ परमेश्वर असे म्हणतो, “जा आणि कुंभारकडून एक मातीचे मडके विकत घे, आणि तुझ्यासोबत लोकांतले वडील आणि याजकांतले वडील बोलावून घे.

¶ मग त्यांनी एक स्तोत्रगीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.