परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”
TSK
TSK · यश 31:4
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले. त्यांना रानटी बैलासारखी शक्ती आहे. तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील. तो त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करील. तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.
जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”
आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो, डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.
परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल. तो ओरडेल, होय! तो आपल्या युद्धाची मोठ्याने ओरडून गर्जना करील; तो आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखवील.
ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर सिंहासारखी गर्जना करेन मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”
सेनाधीश परमेश्वर त्यांचे रक्षण करील आणि ते दगड व गोफणीचा उपयोग करून शत्रूंचा पराभव करतील व त्यांना गिळतील व मद्यप्राशन केल्याप्रमाणे आरोळी करतील आणि ते वेदीच्या कोपऱ्यावरील कटोऱ्यांसारखे भरुन वाहतील.
¶ मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल; युद्धाच्या दिवसात जसे तो युद्ध करत असे तशाप्रकारे तो राष्ट्रांशी युध्द करेल.