TSK

TSK · यश 31:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे त्याने पाहिले, आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार झाला.

तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले.

म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील; आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.

पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील; उंच झाडे तोडले जातील, व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल.

राष्ट्रे महापुराच्या बहुत जलांच्या गोंगाटाप्रमाणे गोंगाट करतील, परंतु देव त्यांना धमकावील तेव्हा ते दूर पळतील आणि वाऱ्यापुढे डोंगरावरच्या भुसासारखे व वादळापुढे धुळीसारखा त्यांचा पाठलाग होईल.

पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.

कारण मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन.

मग अश्शूरचा राजा सन्हेरीबाने इस्राएल सोडले व घरी गेला व आणि निनवेत जाऊन राहिला.