लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले.
TSK
TSK · यश 34:3
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल. त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.
एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरूशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरूशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”
मी तुला जमिनीवर सोडून देईन. मी तुला शेतांत फेकून देईन आणि आकाशातील सर्व पक्षी येऊन तुझ्यावर बसतील असे करीन. मी तुझ्याकडून पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्याची भूक तृप्त करीन.
मग मी तुझे रक्त पर्वतावर ओतीन, तुझ्या रक्ताने प्रवाह भरून वाहतील.
आणि मरी व रक्ताने मी त्याजबरोबर वाद मांडीन. त्याजवर, त्यांच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर जे पुष्कळ प्रकारचे लोक असतील त्यांच्यावर पुराचा पाऊस व मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांचा वर्षाव करीन.
मग “त्या दिवसात असे होईल की, तेव्हा मी समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगास इस्राएल देशात कबरस्थान. ते येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता अडवतील. तेथे गोगाला त्याच्या सर्व समुदायासह पुरतील. ते त्यास ‘हमोन गोग याची दरी’ असे म्हणतील.
“मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत, आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत, तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे. तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
यानंतर ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले; व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.