TSK

TSK · यश 37:33

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

“अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.

आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल सीयोन कन्येच्या डोंगराला, यरूशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.

तेव्हा पाहा, संध्याकाळी दहशत! आणि पहाटेपूर्वी ती नाहीशी होते; जे आम्हांला लुटतात त्यांचा हा वाटा आहे, आणि जे आम्हास लुबाडतात त्यांचा हिस्सा हाच आहे.

यरूशलेमेबद्दल पुढे घडून येणारी गोष्ट त्याच्या उजव्या हातात असेल, किल्ल्याचे दरवाजे फोडण्याचे हत्यार त्याविरूद्ध असेल, त्यांच्या तोंडातून मारण्याचा, युध्दाची ओरड! त्यासाठी हत्यार वेशीसाठी तयार केले, त्यासाठी मातीचे टेकाड बुरुज बांधावे.