TSK

TSK · यश 43:28

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल.

दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.

आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद, आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.

तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.

मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही; तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.

मी त्यांना एक भयावह गोष्ट बनवीन, मी त्यांना सर्व मानवजातीच्या दृष्टीत अरिष्ट असे करीन, ते जीथे घालवले जातील तीथे ते चेष्टेचा व निंदा, म्हण व शाप असे होतील.

परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळंकृत केली आहेत. त्यांच्यावर कसलीही दया केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्ये दुर्गस्थानांना खाली ढकलून; त्याने ते धुळीला मिळविले आहेत. त्याने तिचे राज्य व त्यातले सरदारास अप्रतिष्ठीत व कलंकित ठरविले आहे.

आमच्या दृष्टीने जो राजा सर्वश्रेष्ठ होता जो परमेश्वराचा अभिषिक्त, आमच्या नाकपूड्यातील श्वास. त्यांच्या खाचेत पकडला गेला. ज्याच्या बद्दल आम्ही असे म्हणालो की, “आम्ही त्याच्या सावलीत राहू. तो इतर राष्ट्रापासून आमचे रक्षण करतो.”

सर्व इस्राएलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमाशास्त्राविरोधात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यांवर झाला आहे, कारण त्याच्या विरोधात पाप केले.

म्हणून आता परमेश्वराने अरिष्टावर नजर ठेवून ते आम्हावर आणले आहे, कारण परमेश्वर आमचा देव जी सगळी कामे करतो त्यामध्ये तो न्यायी आहे; आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही.

‹जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.›