TSK

TSK · यश 60:6

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.

इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम,

जेव्हा ते आपली जनावरे व तंबू घेऊन आले ते टोळांच्या थव्यासारखे आत आले आणि त्यांची व त्यांच्या उंटाची संख्या मोजणे अशक्य होते; असे ते देशावर आक्रमण करून नाश करावयास आले होते.

नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरूशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले.

एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.

राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.

राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.

परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून, जे तुम्ही खाली समुद्रात जाता आणि त्याच्यात जे आहे ते सर्व, किनाऱ्यावरील देश आणि तेथे राहणारे त्याची स्तुती करा.

तुला “परमेश्वराचा याजक” आमच्या देवाचा सेवक असे म्हणतील. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हास अभिमान वाटेल.

“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’

तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात.

¶ आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत.