TSK

TSK · यश 63:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले.

परंतु काकुळतीने विनंती करून मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या महान सामर्थ्याने व भुजप्रतापाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा?

मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.

मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते.

या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्यास शरण जाल.

¶ त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास; त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाहीस, त्यांना तहान लागली असता पाणी दिलेस.

मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे याबद्दल मी विचार करतो.

मोशे आणि अहरोन याच्या हाताने तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.

माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?

मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.

स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे. तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत? तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत

शेवटी दानीएल आत आला, त्यास मी माझ्या देवाचे नाव बेल्टशस्सर दिले आहे. त्यास मी स्वप्न सांगितले.

¶ मग त्याने मला सांगितले हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे तो असा: “बलाने नव्हे अथवा शक्तीने नव्हे तर केवळ माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल.” सेनाधीश परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.