आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत.
TSK
TSK · यश 65:18
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.
अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा; अहो पर्वतांनो व रान, त्यातली सर्व झाडे गायन करा; कारण परमेश्वराने याकोबास उद्धारीले आहे आणि इस्राएलात आपले प्रताप दाखविले आहे.
परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील.
यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा.
हे सियोनकन्ये, आनंदोत्सव कर! यरूशलेम कन्यांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे नीतिमत्त्वाने येत आहे; आणि तो तारण घेवून येत आहे. तो विनम्र आहे आणि एका गाढवीवर, गाढवीच्या शिंगरावर तो स्वार झाला आहे.
¶ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.