TSK

TSK · यश 65:25

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ परमेश्वर देव सर्पास म्हणाला, “तू हे केल्यामुळे सर्व गुरेढोरांमध्ये व सर्व वन्यपशूंमध्ये तू शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील.

लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल. वासरू, तरूण सिंह व पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.

माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.

“पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.

तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील, आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील. ते आपल्या तलवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील, आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील. राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही, आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”

¶ शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.

आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.

कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;

¶ नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.