¶ मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.
TSK
TSK · यिर्म 13:19
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. ती पण तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या देशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे.
¶ इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.
ते सर्व यहूदा आणि यरूशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.
¶ परमेश्वराच्या मंदिरासमोर दोन अंजिराच्या टोपल्या व्यवस्थित मांडलेल्या मी पाहिल्या. (बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीम याचा मुलगा यकोन्याला व यहूदाचे सरदार व कारागीर व लोहार कैद करून नेले, यरूशलेममधून बाबेलला नेले)
डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातील नगरात, आणि दक्षिणप्रदेशातील नगरात, बन्यामिनाच्या देशात, यरूशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशात व यहूदाच्या नगरात, व नेगेबातील प्रदेशात मोजदाद करणाऱ्याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.
रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.
नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.