ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका.
TSK
TSK · यिर्म 13:22
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हास कसे कळणार?
त्याप्रमाणे मिसऱ्यांना लाज वाटावी म्हणून अश्शूरचा राजा मिसरच्या कैद्यांना व कूशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना, नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल.
तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही; मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.
तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.
आणि मग असे होईल, तू ही वचने या लोकांस सांगशील आणि ते तुला म्हणतील, परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध काय पाप केले?
यरूशलेमेने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे. सर्व जे तिचा आदर करत असत, त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे. कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती कण्हत आहे व ती तोंड फिरविते आहे.
मग मी तुझा सर्व लज्जास्पद स्वभाव व मिसरातील वेश्यावर्तन तुझ्यापासून दूर करेन. तुझ्याकडे त्यांचे डोळे फार काळ लागून रहाणार नाही, तू मिसराबद्द्ल फार काळ विचार करणार नाही.
त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.
एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
“तेव्हा मी एक दिवा घेऊन यरूशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.’